

Fatal Accident at Pashan-Baner Construction Site
sakal
पुणे : सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना पाषाण परिसरात घडली. मिक्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.