
पुणे : बँकेच्या खातेदारांचा गोपनीय डेटा चोरी प्रकरणातील आरोपीकडे जप्त केलेल्या डेटामधून पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला पाच बँक खात्याची महत्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. त्यातील एका खात्यात तब्बल 100 कोटी रुपये पडून असल्याची माहिती पुढे आली आहे. अन्य चार चार चालू खाती कॉर्पोरेट आहेत. देशभरातील वेगवेगळ्या बँकेतील काही खात्याचा गोपनीय डेटा मिळवून त्यांची विक्री करुन त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याचा कट सायबर पोलिसांनी उलटवला. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अनघा अनिल मोडक, तसेच राजेश शर्मा, परमजीत संधु (दोघे रा. औरंगाबाद) या तिघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
अधिक तपासासाठी त्यांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्या सर्वांना 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे.अनघा मोडक ही या गुन्ह्यातील सर्व आरोपींना एकत्र बोलावले असल्याने आरोपींकडे केलेल्या तपासात माहिती मिळाली. अनघा मोडक ही डेटा विक्रीसाठी मिळविणे व संबधितांपर्यंत पोहचविणे, असे एजंटचे काम करीत असल्याने तिला सर्वांची माहिती आहे. त्यासाठी तिची पोलीस कोठडी आवश्यक आहे. राजेश शर्मा आणि परमजीतसिंग संधु यांनी मिळून डेटा विकत घेण्याकरीता कोणाकडून पैसे घेतले. तसेच त्यांना मिळणारा डेटा ते कोणाला पुढे सुपूर्त करणार होते, याबाबतचा तपास करायचा आहे. डॉरमेट खात्याचा गोपनीय डेटा आरोपींना कोणी दिला आहे किंवा हा डेटा आरोपींनी कसा मिळविला आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सर्व आरोपींकडे एकत्रित तसेच स्वतंत्रपणे तपास करायचा आहे. यातील संशयित आरोपींविषयी आरोपींकडून माहिती घेऊन त्यांचा शोध घ्यायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायालयाने या तिघांना 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.
पुणे पोलिस अन्य राज्यात
पोलिसांनी अटक केलेल्या टोळीत परराज्यासह इतर शहरातील आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे आर्थिक व गुन्हे शाखेच्या पथकांनी हैद्राबाद, वापी, लातूर व पुण्यातील आरोपींच्या घरी छापे टाकले. त्याचबरोबर हैदराबाद आणि वापी येथील संशयित आरोपींचा शोध घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.