भोर - शहरापासून ५ किलोमीटर अंतरावरील भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या वडवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड टेक्नॉलॉजी या महाविद्याला सोमवारी (ता.६) सायंकाळी टाळे ठोकण्यात आले. बैंक ऑफ बडोदा बँकेने ३२ कोटी ३ लाख ९० हजार १५६ रुपयांच्या कर्जाच्या थकबाकीमुळे न्यायालयीन आदेशानुसार कॉलेजचा ताबा घेतला आहे.