Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Farmers Fix Agricultural Labour Rates at Bankar Phata : जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा मजूर अड्यावर मजुरीच्या वाढत्या दरावरून शेतकरी आणि मजुरांमध्ये वाद झाला. संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लागवड आणि शेतीकामांचे नवीन दर निश्चित केले आहेत.
Farmers Fix Agricultural Labour Rates at Bankar Phata

Farmers Fix Agricultural Labour Rates at Bankar Phata

esakal

Updated on: 

ओतूर : बनकरफाटा ता.जुन्नर येथील मजूर अड्यावर बुधवारी सकाळी शेतमजुरीच्या वाढत्या दरावरून शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये जोरदार वाद झाला. वाढत्या मजुरीमुळे शेतीचा उत्पादन खर्च परवडत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत मजुरीचे दर निश्चित केले. या निर्णयानुसार कांदा लागवडीसाठी ७०० रुपये, पुरुष मजुरांसाठी ८०० रुपये, तर शेतीतील इतर कामांसाठी ५०० रुपये रोजंदारी ठरविण्यात आली आहे. या दरांचा फलक बनकरफाट्यासह परिसरातील गावांमध्ये लावण्यात येणार आहे.

Loading content, please wait...