‘यूएई’च्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला

‘यूएई’च्या अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला
Published on: 

दुबई, ता. १७ (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) अल धफ्रा प्रदेशातील बराका अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाह्य परिसरात ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे प्रकल्पातील एका भागाला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून किरणोत्सर्गाची पातळी सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकल्पाची मुख्य यंत्रणा सुरळीतपणे सुरू असल्याचे ‘फेडरल ऑथॉरिटी फॉर न्यूक्लियर रेग्युलेशन’ने सांगितले. या संशयास्पद ड्रोन हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.
अमेरिका-इराण युद्धादरम्यान चार अणुभट्ट्या असलेल्या बराका प्रकल्पाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण कोरियाच्या सहकार्याने २० अब्ज डॉलर खर्चून उभारलेला हा प्रकल्प २०२० मध्ये सुरू झाला. अरबी द्वीपकल्पातील हा पहिला आणि एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे. रशिया-युक्रेन युद्धापासून अणुऊर्जा प्रकल्प युद्धक्षेत्राचा भाग बनण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी इराणनेही त्यांच्या बुशेर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ले झाल्याचा दावा केला होता.

निर्यातीला मिळणार बळ
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून न राहता तेलनिर्यात वाढवण्यासाठी ‘यूएई’ एका नवीन पाइपलाइन प्रकल्पावर वेगाने काम करत आहे. अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी सरकारी मालकीच्या ‘ॲडनॉक’ कंपनीला या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. फुजेरामार्गे होणारी तेलनिर्यात या पाइपलाइनमुळे दुप्पट होणार असून, पुढील वर्षापासून ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhivbandar Nuclear Project
Dapoli Villagers Protest
Dapoli Nuclear Power Project JSW Energy to Invest 44000 Crore for 2800 MW Plant and Create 8000 to 10000 Jobs in Ratnagiri
Devgad nuclear project latest news
Marathi News Esakal
www.esakal.com