Baramati : इतिहासातील पहिला टीडीआर प्रदान...

टीडीआर म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क जे प्रमाणपत्रांच्या स्वरूपात प्राप्त होतात.
baramati
baramati sakal

बारामती - शहरात बांधकाम व्यावसायिकांसाठी एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. बारामती नगरपालिकेने आपल्या इतिहासातील पहिला टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) अधिकृतरित्या प्रदान केला.

बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील विविध कामांसाठी बारामती नगर परिषदेने काही जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी बारामती हद्दीतील गट नंबर 249 येथील मनोज पोतेकर, किशोर जोशी, निशांत मेहता यांनी त्यांच्या मालकीची जागा बारामती नगरपरिषदेस हस्तांतर केली होती.

या जागेच्या मोबदल्यात बारामती नगर परिषदेने चार हजार चौरस मीटरचे बारामतीतील पहिले टीडीआर सर्टिफिकेट सोमवारी (ता. 11) जागा मालकांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते प्रदान केले. या प्रसंगी नगररचनाकार रमेश अवताडे, सहायक नगररचनाकार ऋषीकेश साळी, लिपीक अमोल गोफणे, शंतनु बारवकर उपस्थित होते.

तसेच बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, स्थापत्य विशारद जयंत किकले यांनी या कामी सहकार्य केले.

भविष्यातही टीडीआर देणार...

बारामती नगरपालिकेच्या विकासकामांसाठी आरक्षण दिलेल्या जागांबाबतच टीडीआर देणे शक्य आहे. या पुढील काळात जेथे विविध विकासकामांसाठी जागा आरक्षित केल्या जातील, तेथील टीडीआर तातडीने देण्याची व्यवस्था करणार आहोत- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका.

टीडीआर म्हणजे काय....

टीडीआर म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क जे प्रमाणपत्रांच्या स्वरूपात प्राप्त होतात. जे मालक नंतर स्वत: साठी वापरू शकतो किंवा बाजारात रोख रकमेसाठी त्याची इतर बांधकाम व्यावसायिकांना विक्रीही करू शकतो.

एखाद्या शहराची स्थानिक प्रशासकीय संस्था म्हणजेच बारामती नगरपालिका शहराची विकास योजना (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करते. त्यात उद्याने, रस्ते, उदयोग भवन, सुशोभिकरण व इतरही अनेक गोष्टींसाठी तरतुदी करते.

अर्थातच या जमिनी बाजारभावाने खरेदी करायच्या झाल्या तर वर नमूद केलेल्या व इतरही अनेक सुविधा प्रत्यक्ष बांधण्यासाठी पैसेच उरणार नाहीत. म्हणूनच नगरपालिका अशा जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात 'टीडीआर' देते.

ते हा टीडीआर बाजारात विकू शकतात. बांधकाम व्यवसायिक या टीडीआरचा वापर त्यांच्या इतर प्रकल्पांमध्ये करू शकतात, जेथे जमीन निवासाच्या हेतूने राखून ठेवण्यात आली आहे. टीडीआर हा चौरस फुटांमध्ये मोजला जातो.

फोटो- बारामती- नगरपालिकेच्या इतिहासातील पहिला टीडीआर किशोर जोशी, मनोज पोतेकर, निशांत मेहता यांना प्रदान करताना मुख्याधिकारी महेश रोकडे व इतर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com