

बारामती, ता. २१ : तालुक्यातील कण्हेरीजवळील पुलाजवळ महामार्गावर हायवाचालकाने अचानक लेन बदलल्याने झालेल्या अपघातात अर्जुन अनिल विटकर (वय २६, रा. लिमटेक, ता. बारामती) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र इंद्रजित विठ्ठल खंडाळे (रा. लिमटेक, ता. बारामती) गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता हायवाचालक घटनास्थळावरून पसार झाला.
हा अपघात गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेआठच्या सुमारास कण्हेरी येथील सावळ पुलाजवळ महामार्गावर घडला. याप्रकरणी अमन सुनील विटकर (वय २८, रा. लिमटेक, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायवा (क्र. एमएच ४५-१२४७) च्या अज्ञात चालकाने अचानक लेन बदलून समोर आल्याने अर्जुन विटकर व इंद्रजित खंडाळे यांच्या दुचाकीला (क्र. एमएच ४२ एएल ९७४०) मागून धडक बसली. यात अर्जुन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा तसेच इंद्रजित खंडाळे यांना गंभीर दुखापत झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.