बारामतीत भाग्यजय रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी

बारामतीत भाग्यजय रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी
Published on

बारामतीत भाग्यजय रुग्णालयात
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी
बारामती, ता. २५ : बारामतीतील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये दुर्धर व दुर्मीळ पोटविकारांवरील अत्याधुनिक शस्त्रक्रियांद्वारे तीन रुग्णांवर नुकतेच यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. अचलासिया, हायटस हर्निया आणि पॅन्क्रिएटिक स्यूडोसिस्ट या गुंतागुंतीच्या आजारांवर तालुका पातळीवर प्रभावी उपचार करून रुग्णांना नवजीवन मिळाल्याची माहिती पोट, यकृत व आतड्यांचे तज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ वाबळे यांनी दिली.
डॉ. वाबळे म्हणाले, बारामतीतील ४० वर्षीय महिलेला अचलासिया या दुर्मीळ आजारामुळे अन्न गिळताना तीव्र त्रास होत होता. अनेक ठिकाणी तपासण्या करूनही आजाराचे निदान झाले नव्हते. भाग्यजय हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपीद्वारे अचूक निदान करून दुर्बीणीच्या साहाय्याने (एंडोस्कोपिक) शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून, वजनातही वाढ झाली आहे.
फलटण येथील ७० वर्षीय महिलेला वारंवार उलट्या होणे व रक्ताचे प्रमाण कमी होण्याचा त्रास होता. कोलोनोस्कोपीमध्ये आतड्यात कर्करोगाची सुरुवातीच्या अवस्थेतील गाठ आढळून आली. तातडीने शस्त्रक्रिया करून ती यशस्वीरीत्या काढण्यात आली.
‘‘एका ३५ वर्षीय तरुणाच्या स्वादुपिंडाजवळ जंतुसंसर्गामुळे सुमारे ८०० मि.लि. पू साचून पॅन्क्रिएटिक स्यूडोसिस्ट तयार झाला होता. कोणतीही चिरफाड न करता एंडोस्कोपिक ड्रेनेज व स्टेंटच्या साहाय्याने तोंडावाटे पू बाहेर काढण्यात आला. उपचारानंतर संबंधित रुग्णाची प्रकृतीही समाधानकारक आहे,’’ असे डॉ. वाबळे यांनी सांगितले.

योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यांना प्राधान्य दिल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. किरकोळ वाटणारी लक्षणेही गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. त्यामुळे कोणताही त्रास दुर्लक्षित न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आता बारामतीतही अशा अत्याधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
- डॉ. सिद्धार्थ वाबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com