
बारामती : कृत्रीम बुध्दीमत्तेचा (ए.आय) वापर करुन उस शेती करण्याचा महाराष्ट्रातील प्रयोग आता तामिळनाडूतील उस उत्पादकांनाही महत्वाचा वाटू लागला आहे. तामिळनाडू राज्यातील नामांकित साखर कारखान्यांच्या पुढाकाराने चेन्नई येथे रविवारी (ता. 8) आयोजित चर्चासत्रात बारामतीतील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ए.आय. (कृत्रीम बुध्दीमत्ता) वर आधारित ऊस शेती प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस तामिळनाडू राज्यातील 11 नामांकित साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऊसविकास अधिकारी उपस्थित होते.