कार्यकर्त्याच्या मदतीला अजित दादा धावून आले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते.

Ajit Pawar : कार्यकर्त्याच्या मदतीला अजित दादा धावून आले

बारामती - आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. घटना कितीही किरकोळ असली तरी जिवाभावाचा कार्यकर्ता जेव्हा संकटात असतो तेव्हा हा थोरला भाऊच मदतीला धावून येतो याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा बारामतीत आला.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणारे बारामती तालुक्यातील कटफळ येथील तानाजी पांडुरंग मोकाशी बुधवारी (ता. 23) हे शिखर शिंगणापूर वरून घरी परत येत असताना मेखळी रोडला डोर्लेवाडी फाट्या नजिक टँकरने अचानक वळण घेतल्याने मोकाशी यांच्या दुचाकीची टँकरला धडक लागून अपघात झाला.

या अपघातात मोकाशी यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली. ही घटना घडल्यावर एका व्यक्तीने थेट अजित पवार यांच्याशी संपर्क साधत या अपघाताची माहिती त्यांना दिली. पवार यांनीही तातडीने आपला कार्यकर्ता अपघातग्रस्त झालाय म्हटल्यावर तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना त्याच्या उपचारासाठी हालचाली करण्यास सांगितले. केवळ एवढे करुनच ते थांबले नाहीत तर दर तासाला त्यांनी या कार्यकर्त्याच्या प्रकृतीची विचारपूस सुरुच ठेवली होती. डॉक्टरांना सूचना देत त्याच्यावर उत्तम उपचार करा हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

दवाखान्याच्या कामात दादा किती खंबीरपणे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात याचेच हे एक उदाहरण असल्याची बारामतीत नंतर याची चर्चा होती.

टॅग्स :BaramatiAjit Pawarworker