

बारामती, ता. २० : ‘‘बारामती कार्यक्षेत्रातील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर प्रशासनाने निश्चित केले आहेत. निश्चित दरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनचालक व मालकांवर २० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’’ अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरापर्यंत हे दर लागू राहतील.
विविध वाहनांचे सुधारित दरपत्रक खालीलप्रमाणे आहे:
रुग्णवाहिका प्रकार व दर (रुपयांत):
१. अवातानुकूलित मारुती व्हॅन : २५ कि.मी.साठी ७०० रुपये (पुढील दर १६ रु./कि.मी.). प्रतीक्षा शुल्क १२५ रु./तास. प्रतिदिन अथवा ३०० कि.मी. : ४०००, इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून : १००० प्रतिदिन.
२. अवातानुकूलित मारुती ईको/टाटा मॅजिक : २५ कि.मी.साठी ९०० रुपये (पुढील दर १७ रु./कि.मी.). प्रतीक्षा शुल्क १२५ रु./तास. प्रतिदिन अथवा ३०० कि.मी. : ४५०, इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून : १२०० प्रतिदिन.
३. अवातानुकूलित बोलेरो/फोर्स क्रूझर : २५ कि.मी.साठी १२०० रुपये (पुढील दर १८ रु./कि.मी.). प्रतीक्षा शुल्क १५० रु./तास. प्रतिदिन अथवा ३०० कि.मी. : ५ हजार, इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून : १५०० प्रतिदिन.
४. अवातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर : २५ कि.मी.साठी १५०० रुपये (पुढील दर २२ रु./कि.मी.). प्रतीक्षा शुल्क १७५ रु./तास. प्रतिदिन अथवा ३०० कि.मी. : ७ हजार, इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून : २ हजार प्रतिदिन.
५. वातानुकूलित टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) : २५ कि.मी.साठी २५०० रुपये (पुढील दर ३० रु./कि.मी.). प्रतीक्षा शुल्क २५९ रु./तास. प्रतिदिन अथवा ३०० कि.मी. : १० हजार, इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून : ४ हजार प्रतिदिन.
जादा भाडे आकारल्यास दंड :
नियम मोडल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार, दुसऱ्यासाठी १० हजार, तर तिसऱ्या व त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड आकारला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.