esakal |  नदी, ओढे, नाले स्वच्छतेचा बारामतीकरांना झाला असा फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati is benefited from the cleanliness of rivers, streams and nallas campaign

बारामतीत मार्च, एप्रिल, मे २०२० मध्ये पाटबंधारे व जलनिस्सारण उपविभागातर्गंत सुमारे शंभर किलोमिटर चर स्वच्छतेचा (गाळ व गवत काढणे) कार्यक्रम लोकसहभागातून यशस्वी केला होता.

 नदी, ओढे, नाले स्वच्छतेचा बारामतीकरांना झाला असा फायदा

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव : जिल्ह्यात इतर तालुक्याच्या तुलनेत बारामतीच्या ग्रामीण लोकवस्तीबरोबर बागायत पट्ट्यात पुरसदृष्य पावसाच्या पाण्याचा निचरा लवकर झाल्याची माहिती शासनस्तरावर पुढे आली आहे.

बारामतीत मार्च, एप्रिल, मे २०२० मध्ये पाटबंधारे व जलनिस्सारण उपविभागातर्गंत सुमारे शंभर किलोमिटर चर स्वच्छतेचा (गाळ व गवत काढणे) कार्यक्रम लोकसहभागातून यशस्वी केला होता. अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यात हा पथदर्थी प्रकल्प वेळीच राबविल्याने शिवारासह वाडीवस्तीत शिरणाऱ्या पाण्याचा वेगाने निचरा झाला. परिणामी लोकांचे दैनंदिन जनजीवन लवकर सुरळीत होण्यास मदत झाली. हे विशेष होय.   

जिल्ह्यात बुधवार (ता. १४) रोजी मुसळधार अतिवृष्टी झाल्याने शेतीबरोबर अनेक लोकांचे प्रपंच डोळ्यादेखल वाहून गेले. त्या संकटात भर पडली ती नदी, ओढे, नाल्यांची दुरावस्थेची. पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशा मार्ग न मिळाल्यामुळेही नुकसानीचा आकडा वाढल्याचे निदर्शनास आले. त्या तुलनेत बारामती तालुक्यात पुराच्या पाण्याचा निचरा लवकर झाल्याची माहिती शासनस्तराव स्पष्ट झाली.

बारामती हद्दीतील कऱ्हानदीसह बागायत पट्ट्यातील पाटबंधारे व जलनिस्सारण उपविभागातंर्गत सुमारे शंभर किलोमिटर चर स्वच्छतेचा (गाळ व गवत काढणे) कार्यक्रम गतवर्षीच्या उन्हाळ्यात यशस्वी केला होता. त्याकामी अजित पवार यांनी वेळीच पुढाकार घेतल्याने सध्याच्या संकटाच्या काळात त्या कामाचा चांगला फायदा बारामतीकरांना झाल्याचे बोलले जाते. असे असले तरी बारामतीमधील कऱ्हावागज, अंजनगाव येथील पुर व बंधारा, पाहुणेवाडी हद्दीतील रार्जमार्गावरील पुल पुर्णतः वाहून गेला. शेतीसह फळबागांचे बरेचसे नुकसान झाल्याची नोंद शासनस्तरावर झाली.

या नुकसानीची पाहणी करताना शनिवारी अजित पवार अधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले,  ''यापुढील काळात पुरस्थीती टाळण्यासाठी नदीचे आणखी खोलीकरण करणे, नदी आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमणे हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पुररेषेच्या आत अतिक्रमण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.''

नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात एकूण ७८ चर योजना आहेत. त्यांची एकूण लांबी ३७६ कि.मी. आहे. त्यापैकी बारामती तालुक्यात ६१ चर योजनांमध्ये (लांबी २६३ कि.मी) गाळ व झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. गतवर्षी शासनस्तराव निधीचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी असूनही सदरची चर स्वच्छतेची कामे होत नव्हती. पावसाचे अतिरिक्त पाणी वाडीवस्त्यांमध्ये शिरण्याचा धोकाही वाढलेला होता. ग्रामीण भागातील पक्के रस्तेही उघडले जात होते. या समस्यांचा विचार करून अजित पवार यांनी चर स्वच्छतेचे काम मार्च, एप्रिल, मे महिन्यात हाती घेतले होते. तालुक्यातील जेसीबी, पाॅकलॅड आदी मशनारी असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील उद्योजकांच्या मदतीने तब्बल शंभर किलोमिटर लांबीच्या चर योजना स्वच्छ करून घेतल्या होत्या. त्यामध्ये माळेगाव, सांगवी, नीरावागज, सोनगाव, पिंपळी, गुनवडी, खांडज, घाडगेवाडी, नींबूत कोऱ्हाळे, होळ, लाटे, शिरष्णे, मुरूम आदी गावच्या हद्दीचा समावेश होता.  

''विक्रमी पावसाच्या पाण्याने गावच्या गाव पाण्याखाली गेली. शिवारातील पिके जमिनदोस्त झाली. ही धडकी भरणारी परिस्थिती विचारात घेता बारामतीत नदी व चर स्वच्छतेची कामे अजितदादांनी या आगोदर केल्याने पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यास मदत झाली. यापुढे शेती व मानसे जिवंत राहण्यासाठी नदी, ओढे-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण आणि अतिक्रमण हटविण्याचा कार्यक्रम शासनस्तरावर सातत्याने घेण्यात यावा''
- अशोकराव निवृ्त्ती तावरे ( शेतकरी - माळेगाव)