
बारामती: गेल्या दहा दिवसांपूर्वी काटेवाडीनजीक चालत्या बसमध्ये कोयत्याने हल्ला करुन एका युवकाला जखमी करण्याचा प्रकार घडला होता. या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या वर्षा रामचंद्र भोसले (वय 43, रा. यादगार सिटी, बारामती) या जीव वाचविण्यासाठी पळताना जमिनीवर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेताना वर्षा भोसले यांचा दुर्देवी मृत्यू झाला.