Baramati Bus Stand : बारामती बसस्थानक राज्यात अव्वल.....; एक कोटींचे पारितोषिक मिळणार.....

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने 'अ' वर्ग प्रवर्गात राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करीत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.
Baramati Bus Stand

Baramati Bus Stand

sakal

Updated on

बारामती - हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेत बारामती बसस्थानकाने अ वर्ग प्रवर्गात राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त करीत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सोमवारी (ता. 1) मुंबईत होणा-या कार्यक्रमात बारामतीस प्रथम क्रमांकाने गौरविले जाणार आहे. पारितोषिकापोटी बारामती बसस्थानकास एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार असल्याने या निधीतून आणखी काही सुविधा बारामतीत होऊ शकणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com