Baramati News : बसस्थानक, पोलिस उपमुख्यालय व पोलिस निवासस्थानांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

बारामती शहराची गरज विचारात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या बसस्थानकाच्या जागी अत्याधुनिक व पुढील किमान 25 वर्षांची बारामतीची होणारी वाढ विचारात घेत नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता.
Baramati News : बसस्थानक, पोलिस उपमुख्यालय व पोलिस निवासस्थानांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

बारामती - शहराच्या वैभवात भर घालणारे नूतन अत्याधुनिक बसस्थानक, ब-हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व बारामतीतील पोलिस निवासस्थानांचे शनिवारी (ता. 2) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होणार आहे.

शहराची गरज विचारात घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या बसस्थानकाच्या जागी अत्याधुनिक व पुढील किमान 25 वर्षांची बारामतीची होणारी वाढ विचारात घेत नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता. पन्नास कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारले आहे. 13 जून 2021 रोजी या बसस्थानकाचे काम सुरु झाले व 2 मार्च 2024 मध्ये हे काम पूर्णत्वास गेले आहे. विमानतळाच्या धर्तीवर याचा आराखडा बनविलेला असून एकाच वेळेस फलाटावर 22 तर रात्री मुक्कामासाठी 80 बसेस येथे उभ्या राहू शकतात.

जिल्ह्यातील पोलिस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण व इतर मुलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने बारामतीनजिक ब-हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय साकारण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचण्यास विलंब होतो, या साठी ब-हाणपूर येथे पोलिस उपमुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल व परिस्थिती नियंत्रणात आणणे सहजतेने शक्य होईल, या उद्देशाने हे उपमुख्यालय निर्माण केले गेले.

दुसरीकडे बारामतीतील पोलिस लाईनमधील पोलिस वसाहतीची दुरवस्था झाली होती. पोलिस कर्मचा-यांची संख्याही वाढल्याने प्रत्येक पोलिसाला निवासस्थान चांगले असावे या उद्देशाने नवीन इमारती उभारण्याचा निर्णय झाला. बारामतीतील बहुसंख्य पोलिस कर्मचा-यांना येथे चांगल्या दर्जाचे घर उपलब्ध होईल.

दृष्टीक्षेपात.....

पोलिस उपमुख्यालय.....

• प्रशासकीय इमारत

• पोलिस अधीक्षक व उपअधीक्षक निवासस्थान

• सायबर पोलिस स्टेशन

• विश्रामगृह

• आर.पी.आय इमारत

• प्रशिक्षण केंद्र

• मुले व मुलींचे वसतिगृह

• बहुउद्देशिय सभागृह

• मोटार ट्रान्स्पोर्ट वर्कशॉप

• अंतर्गत रस्ते, परेड ग्राऊंड

बारामती बसस्थानक.....

• प्रकाशयोजना चांगली असल्याने वीजेची बचत होणा

• इमारतीत ओपन टू स्काय गार्डन असेल.

• उत्तम कँटीन होणार असून लोकांना निवांतपणे बसता येईल.

• बसस्थानकाला झिंक रुफिंग असून पन्नास वर्षांची त्याची गॅरंटी आहे.

• देखभाल दुरुस्ती कमी लागावी अशा रितीने रचना केली आहे.

• एकाच वेळेस 80 बसेस रात्रीच्या वेळेस उभ्या राहू शकतील.

• नव्या रचनेत इलेक्ट्रीक गाड्या असतील ही बाब विचारात घेऊन त्याचीही तरतूद होणार आहे.

• एकाच वेळेस 22 बस फलाटावर उभ्या राहू शकतील.

पोलिस वसाहत....

• पोलिस वसाहतीचा खर्च- 50 कोटी रुपये

• पोलिस वसाहतीत 196 सदनिका उभारण्यात आल्या आहेत.

• दोन बेडरुमची 538 स्क्वेअरफूटांची प्रत्येक सदनिका

• सात मजली एकूण सात इमारती साकारल्या.

• पोलिस वसाहतीत सर्व अत्याधुनिक सुविधा दिल्या आहेत.

• पोलिस गृहनिर्माण विभागाकडून इमारतींची निर्मिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com