

State-Level Career Sansad Concludes with a Vision for Developed India
Sakal
माळेगाव : शारदानगर (ता.बारामती) येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर संसदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा आज मोठ्या उत्साहात समारोप झाला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले अधिवेशन आज पार पडले. हे अधिवेशनाचे तिसरे वर्ष होते.