
बारामती : श्रीरामनवमीचे औचित्य साधून बारामतीत आज विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले गेले. येथील देवळे यांच्या श्रीराममंदीरामध्ये चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी असा नऊ दिवसाचा नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. किशोर देवळे, अँड. मकरंद देवळे व ओंकार देवळे यांनी या सर्व उत्सवाचे नियोजन केले.