
काटेवाडी : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीमकोष बाजारात २६ जून ते २५ जुलै या कालावधीत १ कोटी १६ लाख ८१ हजार ५८६ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. २२२ शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या २३ टन रेशीमकोषांना प्रतिकिलो ५०० ते ५५० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले आहे. मागील महिन्यात १४ रिलर्सनी या खरेदी-विक्रीत सहभाग घेतला.