A case has been registered under the Prevention of Corruption Act, and further investigation is underway.
esakal
बारामती : प्रलंबित बिले व ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना बारामती एमआयडीसी डेपो येथील वाहतूक नियंत्रक तथा स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालक अनिल तुकाराम बनकर (वय ५१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.