Baramati: 'शरीरसुखाच्या मागणीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या विधवा महिलेस पोलिस ठाण्यात वाईट वागणूक?

वडगाव निंबाळकर येथे पीडितेला तक्रार देण्याचे दिव्य
Baramati: 'शरीरसुखाच्या मागणीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या विधवा महिलेस पोलिस ठाण्यात वाईट वागणूक?
esakal

वडगाव निंबाळकर: ‘एका नातेवाइकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे,’ या गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या प्रौढ विधवा महिलेस वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिस ठाण्यात वाईट वागणूक दिली, तसेच, ‘समोरच्या पार्टीला तुमच्यावर तक्रार करायला लावतो, मग तुमची तक्रार घेतो,’ अशी तंबीही दिली. अखेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी सांगितल्यावर तक्रारीचे दोन तासांचे दिव्य पार पडले.

अत्यंत गरीब घरातील महिलेने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार कथन केला. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेजारी नातेवाईक राहतो. गेली काही वर्षे तो त्यांच्यावर वाईट पद्धतीने डोळा ठेवून आहे.

Baramati: 'शरीरसुखाच्या मागणीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या विधवा महिलेस पोलिस ठाण्यात वाईट वागणूक?
Pune Rain : पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

तो शरीरसुखाची मागणी करत असून, त्याचे ऐकत नसल्याने मुलांवर वेगवेगळ्या केसेस करण्याची धमकी देत आहे. दरम्यान, या महिलेने पडदे बांधून तयार केलेले बाथरूम व पक्के शौचालय ज्या दिशेला आहे, त्याच दिशेला या नातेवाईकाने जाणूनबुजून दरवाजा तयार केला.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांत तात्पुरता अर्ज दिला आणि ठाणेप्रमुखांना फोन केल्यावर दोन पोलिस तातडीने पाहणीसाठी आले. पण, पोलिसांनी, ‘त्यांचे घर आहे, कुठेही दरवाजा पाडतील, तुम्हाला काय करायचे आहे?’ अशी उलटी समज दिली.

महिलेने दुपारी तीन-सव्वातीनच्या दरम्यान मुलासह पोलिस ठाणे गाठले. ठाणे अंमलदारांना अर्ज दिला. त्यांनी, ‘तुमची तक्रार घेतली जाईल. काही काळजी करू नका,’ असा दिलासा दिला. मात्र, त्यानंतर वस्तीवर पाहणीला गेलेले दोन पोलिस आले आणि नूर बदलला.

एक जण म्हणाला, ‘तो विषय संपला ना मघाशीच. कशाला आलाय परत?’ त्यावर महिला व तिच्या मुलाने, ‘नोंदवून तर घ्या साहेब,’ अशी आर्जव केली. त्यावर पोलिसानी, ‘थांबा, पुढच्या पार्टीला पण बोलवतो आणि तुमच्यावर केस करायला लावतो,’ असे सुनावले.

Baramati: 'शरीरसुखाच्या मागणीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या विधवा महिलेस पोलिस ठाण्यात वाईट वागणूक?
lok sabha 2024: रिटायर शिंदे पुन्हा मैदानात! सोलापूर लोकसभेचे सर्वाधिकार सुशीलकुमार शिंदेंकडे

यावर महिला व मुलाशी पोलिसांची हुज्जत झाली. मग मुलाने रजेवर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांना फोन केला. त्यांनीही समाधानकारक प्रतिसाद दिला आणि ठाण्यात फोनही फिरविला.

पोलिसांनी, ‘घेतो तक्रार,’ असे सांगितले, पण घेतली नाही. पुन्हा मुलाने मुसळे यांना फोन केला. त्यांनी गांभीर्य ओळखून ‘पोलिसांकडे फोन द्या’ असे सुचविले. पण, पोलिसांनी फोन घेण्यास नकार दिला. मग मुसळे यांनीच, ‘स्पीकरवर फोन टाका मी बोलतो’ असे सुचविले. फोन स्पीकरवर टाकून पोलिसांपुढे टेबलावर ठेवला.

मग पोलिस, ‘साहेब, तक्रार घेतलीय. त्यांना बसा म्हणालोय.’ असे म्हणत सरळ झाले. यानंतरही पोलिसाने बाहेर येत, ‘तुम्ही कशाला वर फोन करत चाललाय...’ असा ढोस मुलाला टाकला. मुलाने, ‘आमच्या नेत्याकडे नाही तर कुठे जाणार?’ असे उत्तर दिले.

दोन तासांच्या या नाट्यानंतर मुलांना बाहेर काढले आणि संबंधित महिलेस एकटीला आत बोलवले. महिला पोलिसांच्या समक्ष तक्रार घेतली. यानंतरही ‘दोन-अडीच तास थांबा’ असे सुनावले. मात्र, महिला परतली.

सदर महिलेचा‌ घरगुती वाद जागेसंदर्भात आहे. त्यामुळे दुसरी बाजू जाणून घेतली. तक्रार घेण्याचे काम सुरू असताना संबंधित महिला ठाण्यामधून निघून गेली आहे.

- रवींद्र मोहरकर, ठाणे अंमलदार, वडगाव निंबाळकर (ता. बारामती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com