‘आयएमए’ संघटनेचे बारामतीत आंदोलन

‘आयएमए’ संघटनेचे बारामतीत आंदोलन
Published on

बारामती, ता. ६ : बी.एच.एम.एस.- सी.सी.एम.पी. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) बारामती शाखेने २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनात सहभाग घेतला.
यासंदर्भात शासनाने पुनर्विचार करावा आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणताही शासन निर्णय (जीआर) जारी करू नये, या मागणीचे निवेदन उप विभागीय अधिकारी व नायब तहसीलदार यांच्याकडे दिले गेले.
आय.एम.ए. महाराष्ट्र राज्य, मार्ड, एएसएमआय, तसेच विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती शाखेने आंदोलन केले.
आयएमए बारामतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात हा प्रश्न केवळ डॉक्टरांच्या नोंदणीपुरता मर्यादित नसून वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा, आधुनिक वैद्यकातील प्रशिक्षण, उपचारांची गुणवत्ता, वैद्यकीय निर्णयांची जबाबदारी आणि रुग्णसुरक्षा यांच्याशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे बी.एच.एम.एस- सी.सी.एम.पी. डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी प्रक्रिया स्थगित करून शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
हे आंदोलन कोणत्याही वैद्यकीय पद्धतीविरोधात नसून आधुनिक वैद्यकीय उपचारांमधील वैज्ञानिक व नैतिक मानदंड तसेच रुग्णांची सुरक्षितता कायम राखण्यासाठी असल्याचे आयएमए बारामती शाखेने स्पष्ट केले. आंदोलनामुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत संघटनेने जनतेचे सहकार्यही अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com