बारामतीत आई, मुलाची आत्महत्या

बारामतीत आई, मुलाची आत्महत्या
Published on

बारामती, ता. २१ : तालुक्यातील तांदूळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात आई व अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी उघडकीस आली. मुलाने घरात गळफास घेतल्याचे आढळून आले, तर आईच्या गळ्यावर व्रण असल्याने तिच्या मृत्यूचे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
रमा विजय गावडे (वय ४१) आणि विवेक विजय गावडे (वय १७) यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी विजय रामदास गावडे (वय ४९) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गावडे हे गुरुवारी (ता. २०) रात्रपाळीसाठी कंपनीत गेले होते. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पत्नी रमा व मुलगा विवेक यांना आवाज दिला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजारी राहणारे सुरज भीमराव शिंदे यांना बोलावून दरवाजा उघडण्यात आला. घराच्या आतील खोलीत विवेक याने आकाशी रंगाच्या सुती दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तर रमा गावडे या खिडकीजवळ पाठीवर झोपलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांना आवाज देऊन व हलवून उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसून आले. त्यांच्या गळ्यावर काळसर व्रणही आढळून आले. दरम्यान, शेजारी व नातेवाईकांच्या मदतीने दोघांनाही उपचारासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com