प्रशासनाच्या नियोजनामुळे सर्व निकाल वेळेत जाहीर

प्रशासनाच्या नियोजनामुळे 
सर्व निकाल वेळेत जाहीर
Published on: 

बारामती, ता. १३ : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर मतमोजणीसाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था उत्तम असल्याने वेळेत निकाल जाहीर झाले.
या अगोदर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी जवळपास दोन दिवस चालल्याने सर्वांनाच त्याचा कमालीचा मनस्ताप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत प्रशासनाने काळजी घेत टेबलची संख्या वाढवली. त्यामुळे मतमोजणी तुलनेने लवकर झाली.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक ही मतपत्रिकेवर पार पडली. त्यामुळे मतपत्रिका पेटीतून काढून त्याचे गठ्ठे करणे व इतर प्रक्रियेमुळे मतमोजणी लांबणार का, अशी भीती सर्वांनाच होती. जवळपास ४५० कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी कार्यरत होते. त्यामुळे ही मतमोजणी वेगाने पार पडली. पोलिस यंत्रणेने दोन्ही बाजूंनी रस्ते बंद केलेले असल्याने तुलनेने गर्दीही कमी होती. ज्या गटाची मतमोजणी होती, त्या गटातील कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर येत होते. प्रशासनाने चांगली व्यवस्था केल्यामुळे सर्व २१ जागांची मतमोजणी लवकर उरकली.

जल्लोष टाळल्यामुळे शांतता
दुसरीकडे स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच आवाहन केल्यामुळे सर्वच उमेदवारांनी कोणताही जल्लोष न करता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन आदरांजली व्यक्त करत हा विजय त्यांना समर्पित केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुलालाची उधळण किंवा फटाक्यांची आतषबाजी टाळण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांच्याकडूनच आल्यामुळे कोणीही या फंदात पडले नाही. त्यामुळे वातावरण शांत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com