

बारामती, ता. २१ : उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन संशयितांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. पार्थ वासुदेव अवघडले (वय १९) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०) अशी मंगळवारी (ता. २०) अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना शुक्रवार (ता. २३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम व पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी याबाबत माहिती दिली.
पालखी महामार्गावर बारामती विमानतळाजवळ रविवारी (ता. १८) सायंकाळी राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी शस्त्राने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान विधीसंघर्षग्रस्त बालक आणि पार्थ वासुदेव अवघडले यांना पुणे शहर पोलिसांनी पकडून पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पार्थ अवघडले याच्याकडे चौकशी केली असता, या गुन्ह्यात ज्ञानदेव महादेव शिंदे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. शिंदे हा चालक असून, तो मूळचा करमाळा (जि. सोलापूर) येथील रहिवासी आहे. सध्या तो भिगवण परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.