Baramati: बारामतीत प्रथमच साकारणार 'हॅपी स्ट्रीटस बारामती 'उपक्रम.

हेल्थ अँड फिटनेस झोनमध्ये बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे सदस्य निरोगी जीवनाबाबत नागरिकांनी छोट्या टीप्स देणार
Baramati
BaramatiSakal
Updated on

Baramati - धकाधकीच्या जीवनात मोकळ्या हवेत विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून, मोबाईलपासून दूर राहत वेगळा आनंद अनुभवण्याच्या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामतीत प्रथमच हॅपी स्ट्रीटस बारामती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या बाबत माहिती दिली. रविवारी (ता. 18) विद्या कॉर्नर ते गदिमा पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा आर्ट, म्युझिक, नेचर, गेम, हेल्थ अँड फिटनेस, पर्यावरण असे झोन तयार करण्यात येत आहेत. आर्ट झोनमध्ये मेंदी, टॅटू, फेस पेंटीग, पोट्रेट, कॅरिकेचर, कॅलिग्रॅफी, टाईम स्केच, वारली पेंटीग यांचा समावेश असेल. नागरिकांना याचा मोफत आनंद लुटता येईल.

नेचर झोनमध्ये नक्षत्र उद्यानामध्ये आढळणा-या विविध पक्ष्यांची माहिती तज्ज्ञ देणार आहेत. या शिवाय घोडेस्वारीचाही आनंद बच्चेकंपनीला विनामूल्य घेता येईल.

हेल्थ अँड फिटनेस झोनमध्ये बारामती स्पोर्टस फाऊंडेशनचे सदस्य निरोगी जीवनाबाबत नागरिकांनी छोट्या टीप्स देणार असून दैनंदिन जीवनात त्याचा त्यांना उपयोग होईल.

गेम झोनमध्ये सापशिडी, लुडो, हँड अँड फीट हॉप स्कॉच, टिकटॅक गेम, लगोर, रिंगण, गोट्या, भोवरे, कॅरम, बुध्दीबळ, दोरीवरच्या सामूहिक उड्या असे खेळ विनामूल्य खेळता येणार आहेत. या शिवाय पेनल्टी शूट आऊट, बलून शूट आऊट, आर्चरी, बास्केटबॉल यांचाही यात समावेश आहे.

Baramati
Art Day : चिंता, हुरहूर, अस्वस्थता.... सर्व मानसिक आजार दूर करते आर्ट थेरपी

पर्यावरण विभागात प्लॅस्टिक व ईकचरा गोळा करण्यासह बारामती नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना स्वच्छता व होम कंपोस्टिंगसह इतर महत्वाची माहिती दिली जाणार आहे.

म्युझिक झोनमध्ये विविध कलाकार अँकार्डियन, गिटार, माऊथ ऑर्गन अशा वाद्यांवर विविध लोकप्रिय गीते सादर करणार आहेत.(Marathi Tajya Batmya)

Baramati
Mahila Maharashtra Kesari : कुस्तीच्या पंढरीत दिपाली सय्यदांनी ठाेकला शड्डू; पण...

महिला बचत गटांचे खाद्यविक्रीचे स्टॉल्सही येथे लावण्यात येणार असून त्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे. मुलांच्या मनोरंजनासाठी कार्टून इमेजेस, जादूगार व विविध खेळही येथे मुलांना मनसोक्त खेळता येणार आहेत. (Latest Marathi News)

खाद्यपदार्थ वगळता इतर सर्व बाबी विनामूल्य असून नागरिकांनी वेगळा आनंद लुटण्यासाठी रविवारी सकाळी सहा वाजता विद्या कॉर्नर ते गदिमा रस्त्यावर यावे असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com