.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बारामती : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला बारामती फलटण रेल्वेमार्ग अखेर प्रत्यक्षात उतरण्याचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. या रेल्वेमार्गाच्या मुरुमीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून वेगाने सुरु झाले आहे.
बारामती बाजूकडून तांदुळवाडी व सावंतवाडी भागात तर फलटण बाजूनकडून कुरणेवाडीनजिक मुरुम टाकून रेल्वे रुळ टाकण्यासाठीचा भराव तयार करण्याचे हे काम सुरु झाले आहे.