शेतकऱ्यांकडे 6775 कोटींची थकबाकी अन् 425 कोटींची वसूली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

शेतकऱ्यांकडे 6775 कोटींची थकबाकी अन् 425 कोटींची वसूली

बारामती - महावितरण वाढत्या थकबाकीमुळे कमालीच्या आर्थिक संकटात सापडली आहे. कोरोना काळात ग्राहकांना सहानुभूती दिल्याने आता महावितरणच्या (Mahavitaran) थकबाकीचा आकडा फुगला असून महावितरणपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

महावितरणने आता मात्र कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना (Custemers) शेवटचा इशारा देत वीजबिल भरण्याचे आवाहन केले असून वीजबिल (Light Bill) न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत. बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण 26 लाख 56 हजार वीज ग्राहक आहेत. त्यातील 7 लाख 35 हजार 512 हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर 2020 अखेर सर्व शेतकऱ्यांकडे मिळून 8142 कोटींची थकबाकी होती.

हेही वाचा: 15 दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; पाहा व्हिडिओ

दरम्यान महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी धोरणांतर्गत 2221 कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी 5920 कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम व सप्टेंबर 2020 पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित 50 टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना (Farmers) जवळपास 66 टक्के माफी मिळते. शिवाय भरणा झालेल्या रकमेतून 33 टक्के गावपातळीवर व 33 टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे. दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ 10.42 टक्के (76689) शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत 125 कोटींची थेट माफी मिळवली. ज्या शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे. त्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा वीजपुरवठा खंडीत होईल.

हेही वाचा: पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड व्यवहार्य आहे का?- हायकोर्ट

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडेही 1338 कोटींची थकबाकी, बारामती परिमंडलात शेतीवगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील 9 लाख 42 हजार783 ग्राहकांकडे 1338 कोटी 62 लाख रुपये थकले आहेत. यामध्ये घरगुतीचे 8 लाख 10 हजार ग्राहक असून त्यांचेकडे 183 कोटी रुपये थकीत आहेत. साचलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली असून, सुट्टीच्या दिवशीही वसूली मोहीम सुरु राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत.

loading image
go to top