बारामतीच्या जिरायती भागात शिरसाईचे आवर्तन सुटले

विजय मोरे
Sunday, 12 April 2020

बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजना नुकतीच कार्यान्वित करुन लाभार्थी गावात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

उंडवडी : बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजना नुकतीच कार्यान्वित करुन लाभार्थी गावात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा उन्हाळ्यात दिलासा मिळणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिर्सुफळ, उंडवडी सुपे, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपूर, कारखेल, अंजनगाव, जळगाव सुपे, खराडेवाडी, साबळेवाडी आदी भागाला शिरसाई उपसा योजना वरदान ठरत आहे. या भागात शेतकऱ्यांनी बाजरी, भुईमूग, भाजीपाला आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. या पिकासाठी योजनेचे पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे लाभार्थी गावात पाणीटंचाई कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच शेतकरी पाण्याच्या उपलब्धेनुसार चारा पिके घेतील. शिरसाई डाव्या कालव्याद्वारे उंडवडी कप येथील तळपटी व जगताप तलावात पाणी सोडण्यात येत आहे.

तसेच उजव्या कालव्यातून जळगाव सुपे हद्दीतील दत्तवाडी नजिकच्या येडे पाझर तलावात पाणी सोडण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी थकित पाणी पट्टीतील अर्धी रक्कम व चालु पाण्याची संपुर्ण पाणी पट्टी भरुन सहकार्य करावे. हे अवर्तन महिनाभर सुरु ठेवून संबंधित सर्व लाभार्थी गावाना पाणी सोडण्यात येणार आहे  अशी माहिती माहिती पाटबंधारे विभागाचे स्थापित अभियांत्रिकी अमोल शिंदे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Farming Jirayati Area