Baramati Accident
Baramati Accidentesakal

नियती इतकी कठोर का? बारामतीत आचार्य कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; मुलगा-नातीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं वडिलांनाही मृत्यूनं कवटाळलं

Baramati Accident : दोनच दिवसांपूर्वी आचार्य यांना महिन्याभराच्या उपचारानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. आपल्या वडिलांना फळे घेण्यासाठीच ओंकार आचार्य खंडोबा नगर येथील चौकात थांबले होते.
Published on

बारामती : शहरात रविवारी (ता. 27) झालेल्या भीषण अपघातात (Baramati Accident) ओंकार राजेंद्र आचार्य व त्यांच्या दोन मुली मधुरा व सई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, हा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय 70) यांचे आज पहाटे निधन झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com