

Police detain two minors with two pistols in connection with the firing incident outside an entrepreneur’s residence in Baramati.
eSakal
बारामती, : खंडणीच्या मागणीसाठी धमकावल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने चिडून जात घरापर्यंत येत थेट दोन पिस्तूलातून दोन गोळ्या झाडण्याची गंभीर घटना बारामतीत घडल्यानंतर नागरिकात काळजीचे वातावरण आहे.
या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम व पोलिस निरिक्षक नारायण पवार यांनी रात्रीत वेगाने हालचाली करुन या प्रकरणातील दोन अल्पवयीन मुलांना दोन बंदूकांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणामागे बंडया उर्फ अक्षय काळे हा मुख्य सूत्रधार असून पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत.