

Ganeshotsav in Baramati feels different without Ajit Pawar.
sakal
बारामती : गणरायाचे आगमन झाले आहे... घराघरांत आरतीचे स्वर घुमत आहेत... मंडळांमध्ये भक्तीचे वातावरण आहे; मात्र यंदाच्या बारामतीतील गणेशोत्सवाला एक वेगळीच भावनिक किनार लाभली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात भक्तीचा रंग कायम असला, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या दुःखाची छाया सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव उत्साहापेक्षा आठवणींचा आणि कृतज्ञतेचा अधिक झाला आहे.