

बारामती, ता. २ : शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांसह मुख्य भिगवण रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. नगर परिषदेच्या यंत्रणेने युद्धपातळीवर काम करत अवघ्या दोन तासांत प्रमुख रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करून वाहतूक सुरळीत केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने नगराध्यक्ष सचिन सातव व मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनीही फोनवरुन माहिती घेत नागरिकांना मदतीच्या सूचना दिल्या. नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे, नगरसेवक तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी पहाटेपासून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले होते. पाण्याचा निचरा करणे, अडथळे दूर करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम केले. सार्वजनिक बांधकाम व पोलिसांच्या वाहतूक विभागाचीही मदत घेण्यात आली.
आपत्कालीन यंत्रणेची गरज
अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेची बारामतीत आवश्यकता असून ज्या इमारती ओढ्याच्या प्रवाहात उभारल्या गेल्या आहेत, त्या इमारतींबाबत आता नगर परिषदेला नव्याने विचार करावा लागणार आहे. पावसाचे पाणी पूर्वी ओढ्याद्वारे वाहून जायचे, ओढ्याचा प्रवाह बुजविला गेल्याने अनेक भागात पाणी साठून राहत असल्याचे समोर आले.
आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासह पुराचा धोका संभवू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांशी चर्चा करणार आहे.
- सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.