बारामतीत महावितरण यंत्रणांची उंची चार फूटांने वाढवणार

मिलिंद संगई
Thursday, 22 October 2020

पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीने वीज यंत्रणेची दाणादाण उडाली असतानाही महावितरण कंपनीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. ​

बारामती : दरवर्षी बारामतीत येत असलेल्या कऱ्या नदीच्या पूरामध्ये महावितरणच्या रोहित्रांचे नुकसान होते, ही बाब लक्षात घेता सर्व यंत्रणांची उंची चार फूटांनी वाढविण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिली. 

बारामतीत झालेल्या विक्रमी पावसानंतर कऱ्हा नदीला पूर आल्यानंतर बारामती शहरातील तीन हजारांवर ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता. खंडोबानगरच्या मिनी फीडर पिलरमध्ये पाणी शिरल्याने सिध्देश्वर गल्ली, पंचशील नगर, श्रीरामनगर या भागातील वीज पुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावा लागला होता. भविष्यात अशी स्थिती उदभवू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे 
 क्लिक करा

पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीने वीज यंत्रणेची दाणादाण उडाली असतानाही महावितरण कंपनीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. बारामती शहरासह विभागातील अनेक गावठाण भागातील वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात बाधित झालेली असताना 24 तासात वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम केल्याने जनजीवन तातडीने पूर्वपदावर आले. तर आता नदीकाठच्या उद्धवस्त झालेल्या यंत्रणेला पूर्वपदावर आणण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. बारामती मंडलांतर्गत महावितरणचे तीन कोटींचे नुकसान झाले आहे.

बारामती विभागात उजनीच्या पाण्यात वीज वितरणची 42 रोहित्रे सात किलोमीटर पर्यंत वाहून गेली असून, त्यातील काही रोहित्रांचा नदीपात्रातील पाण्यामुळे ठावठिकाणा लागलेला नाही. तर 52 रोहित्रे जमीनदोस्त झाली आहेत व 184 रोहित्रात बिघाड झालेला आहे. उच्च्दाबाचे 235 व लघुदाबाचे 647 असे 882  विजेचे खांब कोसळल्याने  2462 कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. हे खांब उभे करण्यात नदीपात्रातील पाण्यामुळे अडथळे येत आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील माती, मुरुम वाहून गेला आहे. परिणामी नदीकाठी दलदल निर्माण झाली असून, त्यामुळे वीज खांबाची वाहतूक करता येत नाही. एके ठिकाणी विजेचे खांब घेऊन आलेला ट्रक दलदलीत रुतून पडला आहे. ही दलदल कमी होताच बाधित कृषीपंपाचा वीजपुरवठा लवकरच सुरु केला जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 कंत्राटदारांचे 150 कामगार महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करत आहेत. वीज यंत्रणा पूर्व पदावर आणण्यासाठी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता  गणेश लटपटे,  अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते,  उपकार्यकारी अभियंता रघुनाथ गोफणे,  धनंजय गावडे,  सचिन म्हेत्रे व मोहन सूळ यांचेसह शाखा अभियंते व जनमित्र परिश्रम घेत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati, the height of MSEDCL will be increased by four feet