Baramati Health : बारामतीत १४ हजार विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन तपासणीला सुरुवात; पंचायत समितीचा आरोग्य उपक्रम किशोरवयीन मुलींच्या पोषण-जागरासाठी

बारामती तालुक्यातील १४ हजार विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन तपासणीद्वारे किशोरवयीन आरोग्य समस्यांवर वेळीच लक्ष, आहार मार्गदर्शन व समुपदेशनाची जोड
14,000 girls in Baramati to undergo haemoglobin tests.

14,000 girls in Baramati to undergo haemoglobin tests.

Sakal

Updated on

माळेगाव : बारामती तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे १४ हजार विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्याची विशेष मोहीम पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळणाऱ्या विद्यार्थिनींना गरजेनुसार आहार, आरोग्यविषयक मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com