बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यांना येणार अच्छे दिन, कारण...

बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यांना येणार अच्छे दिन, कारण...

बारामती : एकीकडे कोविडने अर्थव्यवस्था डबघाईला येत असताना बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यात मात्र अनपेक्षितपणे अनेकांना अच्छे दिन येणार आहेत. हे अच्छे दिन भूसंपादनापोटी मिळणा-या नुकसानभरपाईपोटी येणार आहेत. त्याचा प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात 43 कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे. या पालखी मार्गाच्या भूसंपादनापोटी वरील तिन्ही तालुक्यांमध्ये 743 कोटी रुपये नुकसानभरपाईपोटी येणार आहेत. त्याचा प्रारंभ झाला आहे. 

संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यातून पुढे जाणार आहे. याचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 12 गावातील 91.08 तर दुस-या टप्प्यात 23 गावातील 61.72 असे मिळून 35 गावातील 152.80 हेक्टर भूसंपादन करायचे आहे. या मध्ये 7725 शेतकरी बाधित होणार असून, त्यांना निवाड्यापोटी 602 कोटी 82 लाखांची रक्कम अदा करायची आहे.

दरम्यान, टप्पा क्रमांक एकमधील दोन गावातील 9.53 तर टप्पा क्रमांक दोनमधील तीन गावातील 25.07 हेक्टर भूसंपादनाचा निवाडा अद्याप झालेला नाही. या मध्ये 1275 शेतकरी असून त्यांची निवाड्याची रक्कम 140 कोटी रुपये इतकी आहे. 

यातील ज्यांच्या फाईल पूर्ण झाल्या आहेत त्यांना दोन टप्प्यात 43 कोटींचे वाटप झालेले असून अजून 10 कोटी रुपयांचे वाटप येत्या आठवड्यात होईल, कोविडच्या संकटामुळे या कामाला काही प्रमाणात दिरंगाई होत असली तरी लवकरात लवकर भूसंपादन करुन ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न आहे. –दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यवहारांना चालना मिळेल- भूसंपादनापोटी तीन तालुक्यात येणा-या या मोठ्या रकमेमुळे अनेक क्षेत्रांच्या व्यवहारांना चालना मिळेल. शेतजमिन खरेदी, मोकळे भूखंड खरेदी, सदनिका व गाळे खरेदीसह चारचाकी वाहन, सोने खरेदीसह या रकमेमुळे आगामी काळात चालना मिळणार आहे. 

ही आहेत गावे- 
दौंड तालुका-  पाटस, रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा 

बारामती तालुका-  खराडेवाडी, उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, 
गोजुबावी, कटफळ, वंजारवाडी, रुई, सावळ, कण्हेरी, पिंपळी, काटेवाडी  

इंदापूर तालुका-  भवानीनगर, सणसर, जाचकवस्ती, बेलवाडी, लासुर्णे, जंक्शन, भरणेवाडी, अंथुर्णे, शेळगाव, शिरसटवाडी, हगारेवाडी, गोतोंडी, निमगाव केतकी, गोखळी, तरंगवाडी, इंदापूर, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, लुमेवाडी व सराटी. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com