बारामती-इंदापूर उपविभागात ८० हजार दाखल्यांचे वाटप

बारामती-इंदापूर उपविभागात ८० हजार दाखल्यांचे वाटप
Published on

बारामती, ता. ४: आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून १ एप्रिल ते आज अखेर बारामती-इंदापूर उपविभागातील विद्यार्थी आणि नागरिकांना एकूण ७९ हजार ९९९ इतके दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.
नागरिकांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्याकरीता उपविभागाने नियोजनपद्धतीने काम करत दाखलयांचे वितरण केले आहे. एकूण २५१ महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार केंद्र तसेच तालुक्यातील प्रत्येकी १ सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून उत्पन्नाचे प्रमाणपत्र ४२ हजार ७, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र १२ हजार ३४२, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र १२ हजार ७६६, जात प्रमाणपत्र १० हजार ९९७, केंद्र शासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र ६८४ व राज्य शासन आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र ५१३, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३०५, तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र २४५, अल्पभूधारक प्रमाणपत्र १४० आदी विविध सेवांमधून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व दाखल्यांचे मुदतीत वितरण करणेत आले आहे, अशी माहिती श्री. दिघे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

baramati smart and intelligent village project 10 villages sunetra pawar coep pune rural development
baramati traffic police recovered 17 stolen motorcycles fake number plate
A case has been registered under the Prevention of Corruption Act, and further investigation is underway.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com