बारामतीत जय जवान माजी सैनिक संघटनेचे सामाजिक कार्य मोठे - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत जय जवान माजी सैनिक संघटनेचे सामाजिक कार्य मोठे - अजित पवार

बारामतीमध्ये जय जवान माजी सैनिक संघटनेचे सामाजिक कार्य मोठे आहे. या सैनिकांच्या कार्याविषयीची पुस्तिका प्रकाशित होत आहे. हे पाहून खूप आनंद झाला.

बारामतीत जय जवान माजी सैनिक संघटनेचे सामाजिक कार्य मोठे - अजित पवार

माळेगाव - बारामतीमध्ये (Baramati) जय जवान माजी सैनिक संघटनेचे (Jai Jawan Ex-Servicemens Association) सामाजिक कार्य (Social Work) मोठे आहे. या सैनिकांच्या कार्याविषयीची पुस्तिका प्रकाशित होत आहे. हे पाहून खूप आनंद झाला. अनेक युवकांनी आजवर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर सैन्य दलात महाराष्ट्राची मान उंचविली आहे. आजी-माजी सैनिकांची कामगिरी समजापुढे यायला हवी, त्यामुळे लोकप्रबोधन होईल व सैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाईल, यासाठी माजी सैनिक संघटनेने तयार केलेली कार्य़पुस्तिका निश्चित मोलाची भूमिका बजावले, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले.

मुंबई येथील देवगिरी निवास्थानी पवार यांच्या हस्ते बारामती मधील माजी सैनिक संघटनेने तयार केलेल्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, पुस्तिकेचे लेखक व संघटनेचे विश्वस्त अभय थोरात, कल्याण पाचांगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  दरम्यान, माजी सैनिक संघटनेने बारामतीमध्ये रक्तदान शिबीरासह शैक्षणिक स्तरावरील उपक्रम यशस्वीपणे राबविल्याची नोंद आहे.

याशिवाय महिला बचत गटांना रोजगार मिळवून देणे, पुरग्रस्तांना मदत करणे, स्वयंरोजगार उभारण्यासाठी युवकांना मार्गदर्शन करणे, शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविणे, कारगील विजय दिवस साजरा करणे, कोरोनाच्या निर्बंदकाळात पोलिसांबरोबर माजी सैनिकांचे सुरक्षितेतेच्या दृष्टीने योगदान खूप महत्वपुर्ण ठरले आहे. त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, विश्वस्त राहुल भोईटे, भारत जाधव, नामदेव सायार, शिवाजी साळुंके, गणपत फडतरे, रविंद्र लडकत, श्रीमती शोभा घाडगे, रमेश रणमोडे, शिवलिंग माळी, भारत मोरे, श्रीमती वैशाली मोरे, विलास कांबळे, अभय थोरात, पोपट निकम, शिवाजी साळुंखे, मधुकर बोरावके (कायदेशीर सल्लागार) आदींचे कार्य़ उल्लेखनिय ठरले आहे. अर्थात ही माहिती अजित पवार यांच्या निदर्शास आणून देण्यात आली.

सैनिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन....!

देश सेवेसाठी आजी - माजी सैनिक देत असलेले योगदान जनता कदापीही विसरणार आहे. विशेषतः माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांपुढे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठिबद्ध आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील जय जवान माजी सैनिक संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

Web Title: Baramati Jai Jawan Ex Servicemens Association Social Work Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top