Jay Pawar News: अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिल्यास काम करू - जय पवार

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे दिसत आहे
jay pawar
jay pawar sakal

बारामती : जय दादा तुम्ही आता बारामतीत ऍक्टिव्ह व्हायला हवे …आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे, असा प्रेमळ आग्रह बारामतीतील कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांना केला.

अजित पवार यांच्या भव्य सत्कारानंतर जय पवार आज बारामतीत आले होते. त्यांनी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व कार्यालयाची पाहणी केली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील व बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव हेही उपस्थित होते. अजितदादांच्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित राहू न शकलेले जय पवार आज आवर्जून बारामतीत आले होते.

jay pawar
Ajit Pawar Video: "पहिल्या धारेची ते अख्खा खंबा...", अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी वरील मागणी केली.

यासंदर्भात तुम्ही अजितदादांना विचारा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो, असे उत्तर जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले .

jay pawar
Sharad Pawar : ''तुमचा फोटो लावणार, ताकद असेल तर काढून दाखवा'', अमरसिंह पंडितांचं शरद पवारांना उलट उत्तर

कार्यकर्त्यांनी आता थेट अजित पवार यांच्याकडेच जय पवार यांना बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार यांच्या सोबतच सक्रिय करावे, अशी मागणी करण्याचा निर्धार केला आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे दिसत आहे. अजित पवार यांच्या मिरवणुकीमध्ये पार्थ पवार हे त्यांच्या समवेत होते.

jay pawar
Jalgaon BJP News : भाजप शहराध्यक्षपदी कुणाची लागणार वर्णी? उत्सुकता शिगेला

मुंबईतील मेळाव्या दरम्यान अजित पवार यांच्या पाठीमागेच जय पवार हे देखील त्यांच्या भाषणाच्या वेळेस पूर्ण वेळ थांबून होते. आज जय पवार यांनी देखील बारामतीला भेट दिल्यामुळे भविष्यात नवीन राजकीय समीकरणे उदयास येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com