बारामतीत साडेपाच लाखांचे दागिने लंपास

बारामतीत साडेपाच लाखांचे दागिने लंपास
Published on

बारामती, ता. १५ : घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले २८१ ग्रॅम वजनाचे ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तांबेनगर येथील ओंकार बी अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. संक्रांतीनंतर ही चोरी झाली असून, याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुभाष तुकाराम घुले (वय ५५, रा. तांबेनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. घुले यांच्या पत्नी विजया यांनी १४ जानेवारीला संक्रांतीनंतर दागिने बेडमधील सुटकेसमध्ये ठेवले होते. रविवारी (ता. १३) सकाळी साडेदहाच्या सुमारास नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी दागिने काढण्यासाठी सुटकेस उघडली असता, काही बॉक्स रिकामे आढळले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १६ ग्रॅमचा नेकलेस (१० हजार), ५० ग्रॅमचा राणी हार (५० हजार), ५० ग्रॅमच्या बांगड्या (५० हजार) आणि १६५ ग्रॅमच्या आठ वेढण्या (४ लाख ५० हजार) यांचा समावेश आहे.

पोलिसांची अजब तऱ्हा
चोरीला गेलेल्या दागिन्यांचे आजचे बाजारमूल्य ४० लाखांपेक्षा अधिक असताना, पोलिसांनी फिर्यादीत खरेदीच्या पावत्यांनुसार केवळ ५ लाख ६० हजार रुपये किंमत नमूद केली आहे. गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठीच पोलिसांनी ही अजब तऱ्हा अवलंबल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com