Baramati News : बारामतीत कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधून सुप्रिया सुळेंचे सामान स्थलांतरीत

राष्ट्रवादीच्या बारामतीतील कसब्यातील कार्यालयातील खासदार सुप्रिया सुळे यांची सर्व कागदपत्रे आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकातील कार्यालयात स्थलांतरीत केली.
mp supriya sule
mp supriya sule sakal

बारामती - राष्ट्रवादीच्या बारामतीतील कसब्यातील कार्यालयातील खासदार सुप्रिया सुळे यांची सर्व कागदपत्रे आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी भिगवण चौकातील कार्यालयात स्थलांतरीत केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका बदलत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या या भूमिकेला विरोध केला, त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे सुपूर्द केला, त्या वर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, असा प्रवास गेल्या काही महिन्यात घडला.

बारामतीतील कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधूनच खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामतीतील कामकाज इतकी वर्षे चालत होते. मात्र या कार्यालयातील शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे फोटो हटविल्याने व्यथित झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अखेर एका केबिनमधील सुळे यांच्याशी संबंधित सर्वच कागदपत्रे, संगणक व इतर सामान हलविण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीत दोन गट झालेले असल्याने अजित पवार गटाच्या कार्यालयातून कामकाज करणे योग्यही नसल्याने कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेत सामान हलविले.

ज्या मंदीरात देवच नाही ज्या मंदीरात आमच दैवतच नाही त्या मंदीराच्या पाय-या आम्ही चढणार कशा..... अशी प्रतिक्रीया शरद पवार गटाच्या दीपाली पवार यांनी बोलून दाखवली.

आम्हाला सामान नेताना कोणीही रोखले नाही, आम्हीच हा निर्णय घेतलेला असून भिगवण चौकातील कार्यालयात हे सामान हलवित असल्याचे त्यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे ज्या कार्यालयातून कामकाज केले तेथून सामान हलविताना दीपाली पवार सदगदीत झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com