बारामती - खराडेवाडीत गुरुवारी रात्री चोरट्यांचा धुमाकूळ..

विजय मोरे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

उंडवडी - खराडेवाडी (ता. बारामती) परिसरात गुरुवारी (9) रोजी रात्री चोरट्यानी धुमाकूळ घातल्याने येथील ग्रामस्थांना रात्रभर कडक पहारा द्यावा लागला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे येथील एक दुचाकी आणि शेळ्या - मेंढ्या वाचल्या. तर चोरट्यानी इतर ठिकाणहून चोरुन आणलेला फ्रिज जाग्यावर सोडून पळ काढावा लागला. 

येथील पोलिस पाटील लत्ता अरुण खराडे यांच्या वस्ती लगत असलेल्या विठठल यशवंत खराडे यांच्या घरासमोरील दुचाकी व पोपट बबन खराडे यांची शेळी गुरुवारी रात्री चोरट्यानी चोरुन नेहण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील ग्रामस्थ झोपेतून जागे झाल्याची चाहूल चाहूल लागल्याने चोरट्यानी पळ काढला. यावेळी चोरट्याने इतर ठिकाणाहून आणलेला फ्रीज तेथेच सोडला. या फ्रिजमध्ये सहाशे रुपयांची चिल्लर, शेंगदाणे व गोडे तेल सापडले. या चोरट्यांकडे चारचाकी मालवाहतूक टेंपो असावा. दुचाकी व शेळ्या टेंपोत भरण्यासाठी फ्रिज बाहेर काढून ठेवला असावा. आणि ग्रामस्थ चोरट्यांच्या दिशेने आलेले जाणवले असेल, त्यामुळे दुचाकी आणि शेळ्या वाचल्या असून फ्रिज जाग्यावरच राहिला असावा. असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. 

याबाबत सरपंच दत्ता खराडे म्हणाले, " आम्हाला चोरट्यांची चाहूल लागल्यानंतर आम्ही वाड्यावस्त्यांवरील लोकांना फोन करुन सावध केले. आणि चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला, मात्र अंधाराचा फायदा घेवून चोरटे फरार झाले. ती रात्र जागून काढली. आत्ता रात्रीची गस्त सुरु करणार आहोत. " 

Web Title: Baramati-Kharadewadi thunders of thieves on Thursday night ..