

Governor Acharya Devvrat to Inaugurate 'Krushik 2026' Agricultural Expo At Baramati
Sakal
माळेगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून राज्य सरकार आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे अभियान शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरत आहे. रासायनिक शेतीला पर्याय देत शाश्वत, कमी खर्चाची आणि पर्यावरणपूरक शेती पद्धत शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या अभियानाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे.