
माळेगाव : बारामती कृषी विज्ञान केंद्राला (केव्हीके) नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस (NAAS) नवी दिल्ली या संस्थेकडून 'सर्वोत्तम विभागीय केव्हीके –अटारी झोन ८ ' हा पुरस्कार देवून सन्मानित केले. अटारी झोन ८ अंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील एकूण ८२ कृषी विज्ञान केंद्रांचा समावेश आहे. शुक्रवार (ता.६) रोजी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.