Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारप्रमुखांच्या नावांची घोषणा; असे असणार प्रचारप्रमुख

निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची आज रितसर घोषणा करण्यात आली आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsakal
Updated on

बारामती - निवडणूकीचा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची आज रितसर घोषणा करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत प्रदीप गारटकर, वासुदेव काळे व किरण गुजर या तिघांचा समावेश असून ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असेल.

विधानसभा मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुखपदी बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर वेल्हा मध्ये कुलदीप कोंडे व मुळशीमध्ये किरण दगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही वेळातच या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांना, दौंडमध्ये राहुल कुल व खडकवासला येथे भीमराव तापकीर यांना प्रचारप्रमुखपद देत राजकीय बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे दिसते.

या निवडणूकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षांना सोबत घेऊन जाताना आज स्वताः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांच्या समवेत उपस्थित राहिले. महायुती मजबूत असून महायुतीत उत्तम समन्वय आहे हा संदेश राज्यभर या निमित्ताने या तिन्ही नेत्यांनी पोहोचविला असून आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागतील, अशी महायुतीची अपेक्षा आहे.

काही दिवसांपूर्वी विरोध असलेल्या हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यात अजित पवारांना यश आले आहे. शुक्रवारी (ता. 19) हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अजित पवार व सुनेत्रा पवार जेवणासाठी जाणार आहेत. महायुती एकसंघ असून कोणतेही मतभेद नाहीत हा संदेश या निमित्ताने नेत्यांकडून दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Ensures Immediate Medical Aid for Injured Woman in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Sunetra Pawar assumed charge as the Vice President of the educational institution following the trust's governing provisions.
DCM Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com