Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal

Ramdas Athawale : आमच्यासोबत राहिला असता तर पक्ष राहिला असता....

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांनी बारामतीतील रयत भवनमध्ये सभा घेतली.
Published on

बारामती - एकनाथ शिंदे यांनी साथ सोडली तर ती गद्दारी आणि उध्दव ठाकरे भाजपाला सोडून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेली ती काय होती, आमच्यासोबत राहिला असता तर तुमच चिन्ह आणि पक्षही गेला नसता, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उध्दव ठाकरे यांच्यावर बारामतीत टीकास्त्र सोडले.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ रामदास आठवले यांनी बारामतीतील रयत भवनमध्ये सभा घेतली. आठवले म्हणाले, माझा पराभव झाल्यानंतर दिल्लीतील माझ्या बंगल्यातील सामान रस्त्यावर काढले गेले, अनेक जण सत्तेवर नसतानाही आजही दिल्लीत राहतात, माझ्या बाबतीत कॉंग्रेसने अन्याय केल्याची खंत आजही मला आहे. कॉंग्रेसला सत्तेवरुन खाली खेचण्याची प्रतिज्ञा त्याच वेळी मी केली होती.

मी मंत्री बनू शकलो असतो पण प्रणव मुखर्जी, अहमद पटेल व शरद पवार यांनी मला बोलावून मंत्री करता येणार नसल्याचे सांगितले होते.

मी सत्तेसाठी मागे लागत नाही, मी जिकडे जातो तिकडे सत्ता येते मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांचे सरकार सत्तेवर येते. बाळासाहेब ठाकरे यांनी मला हाक दिली तेव्हा शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली. पण नंतरच्या काळात ही एकी टिकू शकली नाही.

सुनेत्रा पवार यांना महायुतीने उमेदवार म्हणून उभे केले असून रिपब्लिकन पक्षाची सर्व मते त्यांना मिळतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com