Sunetra Pawar : विकास रथ सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा

इंदापूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीला पाठिंबा
Sunetra Pawar
Sunetra Pawarsakal

इंदापूर - अजित पवार यांनी कामे करताना तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा न पाहता सर्वांची कामे केली आहेत. हा विकास रथ असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीर उभे रहा असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले.

इंदापूर येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला.यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे, सोलापूरचे दिपक चंदनशिवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, रेहाना मुलाणी, साधना केकाण यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजित पवारांची कामाची पद्धत आणि त्यांनी दिलेली शब्द किती सच्चा असतो .हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे. दादांनाही याची जाणीव असून देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवार विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना आ. दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना कधीही अंतर दिलं जाणार नाही, अशी ग्वाही देत तालुक्यात जो विकास झाला आहे तो अजितदादांमुळे झाला. असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन केले. यावेळी आभार तुषार भोसले यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com