

बारामती, ता. २५ : बारामती तालुका पोलिस ठाण्यालगत असलेल्या पेन्सिल चौकातील मॉलसमोर दोन गटांत झालेल्या मारामारीप्रकरणी १६ जणांविरुद्ध बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळ येथे दोन गटांत झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी संबंधित व्यक्ती रविवारी (ता. २५) रात्री आठच्या सुमारास बारामती तालुका पोलिस ठाण्यात येत होत्या. त्यावेळी पेन्सिल चौकातील मॉलसमोर दोन्ही गटांनी आपापल्या मित्रांना बोलावून एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधितांना पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. या प्रकरणी गणेश शरद आटोळे, विनोद विठ्ठल आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, विकास अशोक आटोळे, तुषार बंडू आटोळे, आदेश ज्योतीराम आटोळे, धनाजी संपत आटोळे, स्वप्निल शिवलाल आटोळे, अभिमान अंबुदास लांडगे, समाधान शशिकांत भिसे, सुशांत बाळू मोहिते, प्रितम अंकुश कुचेकर, मनोज सुहास बागाव, निखिल शिवलाल आटोळे, सोहम राजू लोंढे आणि आदित्य अतुल भिसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गजबजलेल्या चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार प्रदीप काळे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.