

Sachin Satav Assumes Office as Baramati Mayor
Sakal
बारामती : शहरातील नागरिकाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रयत्न असेल. मुलभूत सुविधा देण्यासोबतच बारामतीचा नावलौकीक वाढविण्यासाठी माझ्यासह सर्व माझे सहकारी नगरसेवक मनापासून काम करु, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार सचिन सातव यांनी गुरुवारी (ता. 1 ) स्विकारला. त्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही ग्वाही दिली. या प्रसंगी मुख्याधिकारी पंकज भुसे, सहकारी नगरसेवक उपस्थित होते. सातव कुटुंबिय, अनेक माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.