

Baramati Milk Union Demands Drought Relief
बारामती दूध संघाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिली शासनाला हाक
बारामती, ता. २० : यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यातच पशुखाद्याच्या वाढत्या किमती आणि जनावरांच्या संगोपनाचा वाढलेला खर्च यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान पाच रुपये अनुदान, तसेच पशुखाद्याच्या प्रत्येक पोत्यामागे २५ रुपये अनुदान द्यावी, अशी मागणी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने आज शासनाकडे केली.