

बारामती, ता. १४ : शहरातील मोटारसायकल चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढलेले असून एका महिला पोलिसाचीच दुचाकी थेट बारामतीतील न्यायालयाच्या आवारातूनच चोरट्यांनी चोरून नेली. पोलिसांच्याच दुचाकी चोरीला जाऊ लागल्या तर सामान्यांनी काय करायचे असा प्रश्न बारामतीत उपस्थित केला जाऊ लागला आहे.
गेल्या काही महिन्यांत बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल चोऱ्यांचे प्रमाण कमालीचे वाढलेले होते. बारामती तालुका पोलिसांनी समाधान बाळू काळे या आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १९ दुचाकी जप्त केल्या होत्या. या कामगिरीनंतर बारामतीतील दुचाकी चोऱ्यांचे सत्र थांबेल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात नियमितपणे शहर व तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी सुरूच आहे. परजिल्ह्यातील चोरटे बारामतीत येऊन दुचाकी चोरून नेत असल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवारी (ता. १०) चोरट्यांनी बारामतीच्या न्यायालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसाची दुचाकी न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमधून चोरून नेत बारामती शहर पोलिसांनाच आव्हान दिलेले आहे. या दुचाकीची चोरी होऊन चार दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांचा मागमूसही लागलेला नाही, किंबहुना गुन्हे शोध पथकाने या चोरीकडे फारसे गांभीर्याने पाहिलेलेच नाही, ही बाब या निमित्ताने उघड झाली. पोलिसांच्या दुचाकीचा शोध तरी तत्परतेने घेतला जाईल, असे वाटत असताना चार दिवस उलटूनही याबाबत काहीही झालेले नसल्याचे समोर आले आहे. दुचाकी चोरांच्या विरोधात वाहतूक पोलिस व शहर पोलिस दलाच्या गुन्हे शोध पथकाने माहिती गोळा करून कारवाई करण्याची बारामतीकरांची मागणी आहे.
या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केलेला असून लवकरच आम्ही चोरट्यांपर्यंत पोहोचू. सर्व बाजूंनी माहिती घेऊन सखोल तपास सुरू आहे.
- श्रीशैल्य चिवडशेट्टी, पोलिस निरीक्षक, बारामती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.